Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 - प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.०

 Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0


भारत सरकार कडून Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 खास करून गरोदर महिलांसाठी राबवण्यात येत आहे. ह्या योजनेमध्ये गरोदर महिलांना ११,००० रुपये दिले जाणार आहेत. हि योजना भारत सरकार द्वारा सुरु केली असून देशातील सर्व गरोदर महिलांना ह्याचा लाभ घेता येणार आहे. हि योजना गरोदर महिलांना आर्थिक सहायता देण्यासाठी तसेच जन्म झालेल्या मुलाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहे. ह्या योजनेअंतर्गत महिलेला जर पहिले अपत्य मुलगा किंव्हा मुलगी झाल्यास लाभार्थी महिलेला ५,००० रुपये दिले जाणार आहेत आणि जर महिलेला दुसरे अपत्य मुलगी झाल्यास लाभार्थी महिलेला पुढील ६,००० रुपये दिले जाणार आहेत. ह्या मिळालेल्या रकमेतून लाभार्थी महिलेला आर्थिक मदत होईल व महिलेच्या अपत्यांना देखील ह्याचा फायदा होणार आहे. ह्या Pradhanmantri Matru Vandana योजनेसाठी Online Form देखील भरले जात आहेत. ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला ११,००० रुपये दोन टप्यांमध्ये मिळणार आहेत. ह्या योजनेचा पहिला हप्ता हा ५,००० तर दुसरा हप्ता ६,००० रुपये असणार आहे. 




Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0
Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0





How To Apply For Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 


ह्या Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 चा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला pmmvy.wcd.gov.in ह्या शासनाच्या website वरती यायचे आहे. हि website शासनाची अधिकृत website आहे. ह्या वेबसाईट वरती आल्यावर तुम्हाला Citizen Login ह्या option वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर लाभार्थी महिलेचे नाव, राज्य, जिल्हा, तहसील, गावाचे नाव टाकून create account वरती क्लिक करायचे आहे. create account वरती क्लिक केल्यानंतर तुमचे login successfully होईल. ह्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा mobile number टाकून verify option वरती क्लिक करायचे आहे. verify केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता त्यावर एक OTP पाठवला जाईल तो OTP भरून खालील कॅप्चा भरून validate option वरती क्लिक करायचे आहे. हे झाल्यावर तुम्हाला Beneficiary Registration चा फॉर्म भरायचा आहे. ह्या फॉर्म मधील सर्व माहिती भरणे गरजेचे आहे. 



Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 Eligibility 


  1. हि योजना केवळ महिलांना असून ह्या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊन शकतात. 
  2. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला गरोदर असणे गरजेचे आहे.
  3. पहिला हप्ता मिळवण्यासाठी मुलगा किंव्हा मुलगी जन्मलेली चालेल पण दुसरा हप्ता मिळवण्यासाठी मुलगी जन्मलेली गरजेची आहे. 
  4. राज्यातील तसेच देशातील कोणत्याही गरोदर महिलेला ह्या योजनेचा फायदा घेता येणार आहे.  





Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 Documents 


ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे

  1. लाभार्थी महिलेचे आधारकार्ड
  2. बँक पासबुक 
  3. पासपोर्ट साईझ फोटो 
  4. रहिवासी दाखला 
  5. जन्मलेल्या मुलांचे जन्म दाखले 
  6. मोबाइलला नंबर 



Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 Purpose 


  1. गरोदर महिलांना आर्थिक मदत मिळेल. 
  2. जन्मलेल्या मुलांना औषध घेण्यासाठी फायदा होईल. 
  3. महिलेला Delivery करताना आर्थिक जोर पडणार नाही. 
  4. जन्मदर वाढेल.
  5. ह्या योजनेचा फायदा घेऊन लाभार्थी महिला व मुले आरोगी राहतील. 








Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!