कॅप्टिव्ह मार्केट योजना मिळणार मोफत साडी - Captive Market Yojana 2023

 कॅप्टिव्ह मार्केट योजना २०२३


महाराष्ट्र सरकारकडून Captive Market Yojana सुरु केली आहे. ह्या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेतील रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना दार वर्षी एक मोफत साडी मिळणार आहे. ह्या योजनेची घोषणा नोव्हेंबर २०२३ मध्ये झाली आहे. ह्या योजनेअंतर्गत पिवळे रेशन कार्ड धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली साडी भेटणार आहे. एका वर्षातून केवळ एकदाच हि मोफत साडी मिळणार असून ही साडी सणादिवशी वाटप केली जाईल. ह्या योजनेचा फायदा सर्व पिवळे रेशनकार्ड धारकांना होणार आहे. 




Captive Market Yojana 2023
Captive Market Yojana 2023 




Captive Market Yojana Apply 


ह्या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया नसणार आहे. Captive Market योजनेतून भेटणारी साडी तुम्हाला तुमच्या भागातील रेशनधान्य केंद्रामध्ये वाटप केली जाणार आहे. तुम्ही तुमचे पिवळे रेशनकार्ड तुमच्या भागातील रेशनधान्य केंद्रात दाखवून ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. 



Captive Market Yojana पात्रता 


ह्या योजनेची पात्रता खालीलप्रमाणे असणार आहे. 

  1. ही योजना केवळ महाराष्ट्र राज्यात सुरु झाली असून ह्याचा फायदा राज्यातील सर्व पिवळे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबांना घेता येणार आहे. 
  2. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे रेशनकार्ड असणे गरजेचे आहे. 
  3. पांढरे किंव्हा केशरी रेशनकार्ड धारकांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
  4. लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी एकच साडी भेटणार आहे. 







Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!